रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये रोग आणि किडींमुळे पिकाचे उत्पन्न कमी होते तरी त्याचे योग्यवेळी निदान करून नियंत्रण केल्याने होणारे नुकसान कमी करू शकतो.
रोग
१) ब्लाईट
लक्षणे
देठ, फांद्या, पानं आणि शेंगांवर बिंदूंसारखे गडद तपकिरी ठिपके तयार होतात. अतिवृष्टी झाल्यास संपूर्ण झाडावर अनिष्ट परिणाम होतो.
उपाय
रोगाच्या प्रादुर्भावावर इंडोफिल एम-४५ किंवा कॅप्टन @ ३६० ग्रॅम/ १०० लि. प्रति एकर फवारणी करावी. गरज भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करा.
२) राखाडी बुरशी
लक्षणे
पानांवर पाण्याने भिजलेले छोटे ठिपके दिसतात. संक्रमित पानांवर डाग गडद तपकिरी होतात. तीव्र प्रादुर्भावात, झाडाच्या फांद्या, पाने आणि फुलांवर तपकिरी ठिपके दिसतात, जेव्हा झाडाची पूर्ण वाढ होते. संक्रमित फांद्या शेवटी तुटतात आणि वनस्पती मरते.
उपाय
प्रादुर्भाव दिसून आल्यास, कार्बेन्डाझिम @ २ ग्रॅम/लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) तांबेरा
लक्षणे
पानांच्या खालच्या पृष्ठभागावर लहान, गोलाकार ते अंडाकृती, हलके किंवा गडद तपकिरी रंगाचे फोड तयार होतात. नंतरच्या अवस्थेत, पुसट काळे होतात आणि प्रभावित पाने कुजतात. जस जसा रोग वाढत जातो हे फोड, फांद्या आणि शेंगावर देखील दिसतात.
उपाय
मॅन्कोझेब ७५ डब्लूपी @ २ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. १० दिवसांच्या अंतराने आणखी दोन फवारण्या करा.
४) फ्युसारियम मर
लक्षणे
रोपे मरगळतात, पाने पिवळी पडतात, फांदीच्या आतील भाग तपकिरी किंवा लाल रंगाचा होतो.
उपाय
प्रादुर्भाव आढळल्यास प्रोपिकोनाझोल ३०० मिली प्रति एकर २०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किड
१) घाटेअळी
लक्षणे
हरभरा पिकाचे घाटेअळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. पीक ३ आठवडयाचे झाले असता त्यावर बारीक अळया दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात.
उपाय
पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी करावी. यासाठी २५ किलो निंबोळी पावडर रात्रभर ५० लि. पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क काढून त्यामध्ये ४५० लिटर पाणी टाकावे. हे द्रावण १ हेक्टर क्षेत्रावर फवारावे.
पुढे १० ते १५ दिवसांनी हेलिओकिल ५०० मिली ५०० लि. पाण्यातून प्रति हेक्टर या विषाणूजन्य किटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यकता असेल तर तिसरी फवारणी १८.५ % एस.सी. क्लोअॅन्ट्रीनिलीप्रोल १०० मिली हेक्टरला ५०० लि. पाण्यातून फवारावे. तसेच ५ कामगंध सापळे/ हे. लावावेत. त्यामुळे किडीचे नेमके प्रमाण कळते आणि फवारण्या देणे योग्य ठरते.
२) लष्करी अळी
लक्षणे
कोवळ्या अळ्या सुरवातीला पानांचे पृष्ठभाग एका बाजुने खातात आणि दुसरी बाजु तशीच (खिडकीसारखे खाणे) शाबूत ठेवतात. कळ्या आणि शेंडे नाहीसे होईपर्यंत रोपांना खाल्ले जाते. मोठ्या अळ्या पानांवर वैशिष्ट्यपूर्ण छिद्रांची नक्षी आणि पानांच्या फाटलेल्या कडा तसेच विष्ठांच्या ओळी सोडतात. त्या झाडाचे बुड देखील कापू शकतात किंवा ते प्रजनन संरचना आणि कोवळ्या फळांवर देखील हल्ला करु शकतात. जास्त संक्रमण झाल्यास, मोठ्या प्रमाणात पानगळ होते.
उपाय
प्रकाश किंवा कामगंध सापळे वापरावे. एमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी @ ०. ४ ग्रॅम/लि. स्पिनोसॅड ४५ एससी @ ०.३ मिली/लि. सतत होणारे नुकसान टाळण्यासाठी लवकर काढणी करा. उच्च तापमानात अळ्या आणि कोषांना उघडे पाडण्यासाठी जमिन नांगरा.
Post Views: 82
Leave a Comment